- देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. १६ जून २०२१ :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना देखील महाराष्ट्र शासनाची अथवा पोलीस आयुक्तांची परवानगी न घेता आरोपी शहरात आला. सांगवी येथील घोलप कॉलेजजवळ आरोपी आला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार ६०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
याबाबत पोलीस कर्मचारी शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मच्छिंद्र हरिकिसन वरकटे (वय ३२, रा. इंद्रपरी कॉलनी, तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) रोजी घडली.
















