- लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवारी (दि. १८) रोजी ‘कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी. खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा या तीन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे १८ ते ४४ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय, प्रेमलोकपार्क दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय या तीन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना व एचसीडब्ल्यू/एफएलडब्ल्यू यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) संजय काळे सभागृह इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना आर.टी.टी.सी सेंटर पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली घरकुल दवाखाना चिखली पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगर शाळा यमुनानगर रुग्णालय स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी आचार्य अत्रे सभागृह, वाय.सी.एम रुग्णालयाजवळ नेहरुनगर उर्दु शाळा मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल एस. एस. अजमेरा स्कुल, अजमेरा क्वालिटी सर्कल, भोसरी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी नवीन भोसरी रुग्णालय सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम) गंगोञी पार्क,दिघी पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी पिंपळे गुरव माध्यमीक शाळा अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा गणेश इंग्लिश स्कुल,दापोडी शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी कासारवाडी दवाखाना बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ पि. चि. मनपा शाळा, वाकड आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा नवीन जिजामाता रुग्णालय फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ( जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे मनपा शाळा किवळे मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळे अश्विनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड प्रेमलोक पार्क दवाखाना मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या ५६ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि. १८/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.