- शहरसंघटक हरेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना योद्धांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२१) :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी तयार केलेल्या शिवसेना या संघटनेच्या स्थापनेला आज (शनिवारी) ५५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने काळेवाडी-रहाटणी विभागाच्या वतीने शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने मात्र उत्साहात हा वर्धापनदिन शहरसंघटक हरेश नखाते यांच्या काळेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
दरम्यान, वर्धापनदिनाचे औचित्य साधून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सुखदेव आप्पा खेडकर, कृष्णा निकम, कोळी महासंघ जिल्हा अध्यक्ष डी एम कोळी, सचिन सरवदे, सुभाष पवार, वैशाली राऊत, संगिता पवार, योग गुरू सुरेश विटकर, तुळजभवानी महिला मंडळचे अध्यक्ष सुमन कोकणे, डॉ. सुहास साळुंखे, डॉ. भुषण ढालपे, डॉ. संजय अटकर, डॉ. शहनाझ शेख बजरंग दलाचे अविनाश कदम, अॅड. राजेंद्र गोळे, अॅड. मंगेश नढे, ओंकार मुळे, आदर्श शिक्षक प्रदिप कासार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर यांच्या हस्ते सर्व कोरोना योध्दा व ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते नेताजी नखाते, रमेश नखाते, मंगेश कदम, श्यामराव काळे, जितेंद्र विटकर, पांडुरंग पाटील, अदिक भोसले, शिवसेना विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के, शाखा प्रमुख सागर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते, काळेवाडी विभाग प्रमुख गोरख पाटील, रहाटणी विभाग प्रमुख प्रदिप दळवी, संघटक अंकुश कोळेकर, गणेश वायभट, उपविभाग प्रमुख अनिल पालांडे, शाखा प्रमुख नरसिंग माने, शाखा प्रमुख सावता महापुरे, रविकिरण घटकर, प्रजाक नढे यांनी केले होते.