- पती, सासू व दिरावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२१) :- फिर्यादी महिलेची मुलगी आरोपींच्या घरात नांदत असताना आरोपींनी दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना २३ एप्रिल रोजी देहूरोड रेल्वे स्टेशन जवळ घडली.
याबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती विजय सुदाम सोनवणे, सासु कांताबाई सुदाम सोनवणे, ननंद माया विशाल कांबळे, दीर संजय सुदाम सोनवणे, दीर सचिन सुदाम सोनवणे (सर्व रा. शेवाळे सेंटरजवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.