न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सागर खंडू सावळे (वय ३५, रा. पिंपळे गुरव) यांची दुचाकी (एमएच १४ सीझेड ३७९८) कासारवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसमोरून १५ जून रोजी दुपारी चोरट्यांनी चोरून नेली. तर, कोयनागर येथून संजय किसनराव मुंडे यांची दुचाकी (एमएच १४ सीई ४९९८) चोरट्यांनी लंपास केली.