- एकाचा मृतदेह सापडला तर, एकाचा शोध सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- शेलारवाडी जवळील कुंडमळा येथील इंद्रायणी नदी परिसरातील रांजण खळगे भागात पर्यटनासाठी आलेले दोघे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास नदीपात्रात पडल्याने वाहून गेले असून एकाचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. वैष्णव भोसले (वय ३०, रा . दांगट वस्ती, देहूरोड ) असे त्यांचे नाव आहे.
राकेश नरवडे राहणार मोशी यांचा शोध घेण्यात येत आहे. आयुष नरवडे या लहान मुलाला स्थानिक नागरिकांनी वाचविले असून तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या पथकामार्फत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी सांगितले आहे.