- मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- ‘पुण्यातील कात्रज घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा मृतदेह आकुर्डीतील आनंद गुजर (वय ४३) नामक व्यक्तीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
गुजर हे व्यवसायिक होते. लॉकडाऊनमुळे अडचणीत असल्याचे समजते. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.