- शहर राष्ट्रवादीची घरघुती गॅस दरवाढ व महागाई विरोधात पिंपरीत नारेबाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- घरघुती गॅस दरवाढीसह महागाई विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज शनिवारी (दि. ३) रोजी आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकारने जनतेवर बेसुमार महागाई लादल्याच्या आरोप राष्ट्रवादीने केला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी महिलांनी चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध केला.
माजी महापौर योगेश बहल, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, शमीम पठाण, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, अतुल शितोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘मोदी है तो महंगाई है’, ‘पेट्रोल डिझेलची सेन्चुरी झाली, मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

















