- १८ वर्षावरील लाभार्थ्यांना १०० टक्के ऑनलाईन नोंदणीची अट..
- तर ४५ वर्षावरील सर्वांना ऑन द स्पॉट डोस..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या रविवारी (दि. ०४) रोजी ‘ कोविशिल्ड ’ चा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०४-०७-२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट, बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, एसएस अजमेरा स्कुल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, निळु फुले नाट्यगृह सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, भाटनगर दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, काकाज इंटरनॅशनल स्कुल काळेवाडी, जुने तालेरा रुग्णालय, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे आणि फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन या ३२ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, २००, ३००, ४०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हेडगेवार जलतरण तलाव, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, महापालिका कन्या शाळा चिखली, आरटीटीसी सेंटर, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, आप्पा भानसे शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, महापालिका शाळा वाकड, महापालिका शाळा रहाटणी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखाना, मल्हारराव विठ्ठल तरस मराठी महापालिका शाळा विकासनगर, किवळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या २९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, १५०, २००, ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल. वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असून दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल भोसरी, व नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथिमक शाळा, ग प्रभाग पिंपरी-१८ या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला व दुसरा १०० व ५० डोसच्या क्षमतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.