- पतीकडून पत्नीचा छळ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२१) :- माझं एका महिलेशी अफेअर होते, आजही आहे. पण, बॅडलक तू माझ्या गळ्यात पडली, तुझ्याशी लग्न झाल्यापासून पनोती मागे लागली’ असे म्हणून पतीने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या आईकडून पैसे घेतले व दारु पिऊन फिर्यादीला मारहाण केली.
ही घटना पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे २१ ऑगस्ट २०११ ते २ जुलै २०२१ दरम्यान घडली. विवाहितेने शुक्रवारी (दि. २) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार ॲगनोला ॲन्थुनी सॅम्युयल (वय ५०), डॉनबॉक्सो ॲन्थुनी सॅम्युयल (वय ४५), डॉर्ती फिलीप फ्रँक (वय ५८, शांतीनगर, वानवडी), सुनिता मॅक्सी लोबो (वय ५४, रा. वडगांव शेरी, पुणे) व लोरिन आरुख्यनादन ॲन्थुनी (वय ५२, रा. खडकी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.