न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२१) :- पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. ११) पासून ते १५ जुलैपर्यंत राज्यव्यापी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरिकांशी संपर्क साधून महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभासाठी सोमवारी (दि. १२) रोजी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे पिंपरीत येणार आहेत.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे प्रभारी अक्षय जैन, कौस्तुभ नवले आदी उपस्थित राहणार आहेत, नागरिकांनी उत्सुफूर्तपणे या मोहीमेत सहभागी होऊन केंद्र सराकरप्रती आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.