न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- प्रभाग क्रमांक २३ थेरगावमधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका अर्चनाताई तानाजी बारणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती.
खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.त्याचा अंत्यविधी आज मंगळवारी (दि. १३) राञी ८.०० वाजता थेरगाव स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.












