- साडेसात लाखांचा माल लंपास; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शटरचा डाव्या बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. कंपनीतून सात लाख ४८ हजार ४४ रुपये किमतीचा गिअर बॉक्स, गेअर व्हील, गेअर शाफ्ट आणि इतर माल चोरून नेला.
ही घटना चिखलीतील शेलारवस्तीच्या ऍक्योरेट ऑटोमेशन अँड पॅकेजिंग सिस्टीम येथे सोमवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली. संजय अमृतलाल यादव (वय ३७, रा. साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












