- अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल चोरला; भोसरी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- मेडिकल दरवाजाचे लाॅक आणि कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मेडिकल दुकानातून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम तसेच रेनकोट असा एकूण २८ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना मंगळवारी (दि. १३) पहाटे साडेपाच वाजता मोशीतील शिवाजीवाडीच्या चौधरी मार्केट शेजारील रिलॅक्स मेडिको केमिस्ट अँड ड्रगिस्ट या मेडिकल दुकानात घडली.
नारायण घीसाराम चौधरी (वय २२, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












