- लग्नासाठी तगादा लावल्याने केला खून; वाकड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- १० वर्षांपूर्वी प्रेयसीचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यांनंतर याबाबत त्या आरोपीने पोलिसांना कबुली दिली आहे. किशोर लक्ष्मण घारे (रा. डोणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चांदणी सत्यवान लांडगे (वय २२, रा. बलदेवनगर, पिंपरी) अशी हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. ‘तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता दररोज रात्री मी दचकून उठायचो. गेल्या १० वर्षात मला एकदा देखील नीट झोप लागली नाही.
‘आरोपी किशोर आणि मृत चांदणी यांचे प्रेमसंबंध होते. चांदणीची गर्भधारणा झाल्याने तिने किशोरकडे विवाहासाठी तगादा लावला. म्हणून संतापलेल्या आरोपी किशोरने विवाहाच्या बहाण्याने नेऊन चांदणीची हत्या केली आणि जंगलात टाकून दिला. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.