- आकुर्डी-दुर्गानगर परिसरात हातात बेड्या घालून काढली धिंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय २१, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. त्याची पोलिसांनी आकुर्डी दुर्गानगर येथून हातात बेड्या घालून धिंड काढली आहे.
‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होते. गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती काढत तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर चिखली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.