- कचराकुंडीमुक्त संकल्पनेचा करणार अभ्यास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कचराकुंडीमुक्त संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी इंदूर शहराचा दौरा केला.
आता उपायुक्त, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक दौऱ्यावर गेले आहेत. तेथील कचरासंदर्भातील संकल्पना शहरातील ४ प्रभागात प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे.