- या २६ केंद्रांवर लसीकरण; गरोदर मातांसाठीही डोस राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (दि. १७) रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा फक्त पहिला डोस हा १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय
प्रेमलोक पार्क दवाखाना या ८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना पिं.चिं. मनपा. शाळा रहाटणी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या ८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल.
गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करण्यासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह. भ. प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवारी नविन जिजामाता रुग्णालय या लसीकरणकेंद्रावर‘कोविशिल्ड’चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी १०.०० ते सायं ०५.०० या वेळेत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येणार आहे.