न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुखपदी हरेश नखाते यांची निवड झाली. त्यानिमित्त काळेवाडी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, सहसचिव सुरेश विटकर, महिला उपाध्यक्ष शुभांगी देसाई, संचालिका संगीता कोकणे, सुरेश नखाते, गोदावरी रामगडे, एकनाथ काटे, मधुकर कसबेकर, दत्तात्रय शेडगे, मधुकर पंधरे, गंगाधर घाडगे, अनिल कुलागे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ उपस्थित होते.