- दत्तात्रय भेगडे अध्यक्ष तर, दिपक कलापुरे यांची कार्याध्यक्षपदी निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची २०२१ ते २०२४ ची नविन कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. मावळते अध्यक्ष काळूराम आण्णा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १६ जूलै) कोअर कमिटीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदावर आणि दिपक कलापुरे यांची कार्याध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. २०२१ ते २०२४ च्या नुतन कार्यकारीणीवर भालचंद्र उर्फ बाळासाहेब बोराटे (उपाध्यक्ष); दिनेश भालेकर (सचिव); दशरथ पानमंद (खजिनदार); काळूराम आण्णा गायकवाड आणि प्रमोद बागलाने यांची सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे.