- दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी हराळकर यांचे मित्र धाकड (सध्या रा. दुबई) यांचा विश्वास संपादन केला. धाकड यांना २० हजार वैद्यकीय हॅन्डग्लोजचे बॉक्स देतो असे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख ३४ हजार रुपये घेतले. तसेच हॅन्डग्लोज न देता त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी धाकड यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता आरोपी कृष्णकांत याने दुसऱ्या आरोपी महिलेची मोठ्या गुंड लोकांची संबंध आहेत. ती तुला संपवून टाकेल, अशी धमकी धाकड यांना दिली. ही घटना सांगवी येथे घडली.
हर्षल लालचंद धाकड यांच्या वतीने यशोधन मधुकर हराळकर (वय ४४ रा. औंध पुणे) यांनी शनिवारी (दि. १७) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णकांत व्ही आणि महिला आरोपी (दोघेही रा. निजाम पेठ, हैदराबाद, तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.