- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- आरोपींनी आपसात संगनमत करून इंटरनेटचा वापर करून फिर्यादीच्या एचडीएफसी बँक अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड हॅक केला. त्याद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातील ३८ लाख चार हजारांचे परस्पर ऑनलाइन ट्रांजेक्शन करून फिर्यादी यांची फसवणूक केली.
ही घटना १५ जुलै रोजी काळेवाडी फाटा येथे घडली. सुबोध चंद्रकांत कोरडे (वय ६१, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी शनिवारी (दि. १७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभोमोय बिश्वास, समीर तमंग आणि आलोक पाल (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.













