- केवळ ‘कोव्हॉक्सीन’ डोसच मोफत उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- वय १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचे लसीकरण गुरुवारी (दि. २९) रोजी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर एकूण २०० लाभार्थीक्षमते इतका केला जाईल. त्यापैकी कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या १८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
तसेच प्रायोगिक तत्वावर पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या २० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
पहिला डोस हा ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दूसरा डोस ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे असे सूत्र असेल.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना कै ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम.रुग्णालय, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ, सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर एकूण २०० क्षमतेइतका केला जाईल. त्यापैकी १८० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे केले जाईल.
तसेच प्रायोगिक तत्वावर पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या २० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
पहिला डोस हा ९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे तर दुसरा डोस ९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे असे सूत्र असेल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि.२९/०७/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि. २९/०७/२०२१ रोजीया लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.