- महापालिका अधिनियमनमधील तरतुदीचा भंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कन्येच्या लग्न मांडव डहाळे कार्यक्रमातील नृत्य महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच भोवले आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कनिष्ठ अभियंत्याला सक्त ताकीद दिली आहे. सुनील सिद्धाप्पा बेळगावकर असे सक्त ताकीद दिलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांच्या कन्येचा मे महिन्यात विवाह झाला. डहाळे कार्यक्रमात महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर सहभागी होऊन नृत्य करत होते. कोरोनाच्या नियमांचे पालन न करता आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचा भंग करून बेळगावकर नृत्य करत होते. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.
कनिष्ठ अभियंता बेळगावकर यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनमधील तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे बेळगावकर यांना सक्त समज दिली आहे. यापुढे भविष्यामध्ये अशा प्रकारचे गैरवर्तन घडणार नाही. याची त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी; अन्यथा यापेक्षा कडक शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
















