- विकेंड लॉकडाऊनही रद्द करण्याबाबत होणार निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- ज्या भागात बाधित रुग्णांचे प्रमाण एखादा टक्का राहीले आहे, तिथे निर्बंध शिथिल होतील. तसेच आस्थापने आणि हॉटेल्स आणि इतर व्यवहारांची वेळ ८ वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, अशी चर्चा मागील बैठकीत झाली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा सकारात्मक राहिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली.
वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.
“करोनामुळे अनेक जण घरूनच काम करत आहेत. सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यांना खरेदी करता वेळ पाहिजे. त्या दृष्टीने शनिवार, रविवार जी सुट्टी आपण देतो त्यामध्ये रविवारी सुट्टी द्यावी आणि शनिवारी व्यवहार चालू राहावे, असा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यावेळी सर्व नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
















