- लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- आरोपीने ११ वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तसेच पीडित मुलीच्या घरात झोपण्याचा बहाणा करून तिच्यावर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र, अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मार्च ते एप्रिल २०२१ या कालावधीत संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिपक पद्म सिंग (वय ३०, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.













