न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- थेरगाव परिसरातील प्रगतशील शेतकरी व सामजिक कार्यकर्ते भालचंद्र विठोबा बारणे (वय ६५) यांचे मंगळवारी (दि.३) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. एका खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, सूना, नातवंडे, चुलत भाऊ, पुतणे असा परिवार आहे. अपक्ष गटनेते व नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांचे ते वडील होतं.