- डीजीटल स्वरुपातच शुभेच्छा द्या; भाऊसाहेब भोईर यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- राज्यातील कोरोना महामारीच्या आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत.
प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दुरध्वनी किंवा डीजीटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून महाराष्ट्राला कोरोना मुक्त व पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन या लढाईत आपले योगदान द्यावे, असे आवाहन स्वी. नगरसेवक तथा अ.भा. मराठी नाट्य परिषद, पिं. चिं. शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.