- पिडीत मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार; तरुणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२१) :- मागील दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत मैत्री केली. त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावल्याने ती अनेक वेळा त्याच्याकडे अंमळनेर येथे गेली होती. २७ जुलै रोजी पिडीत मुलगी घरातून निघून जाऊन आरोपीकडे अंमळनेर येथे गेली. तिथे तिने विषारी औषधाच्या गोळ्या खाल्ल्या.
तिला तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर पुण्यातील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल असताना तिने दोन महिन्यांपूर्वी गरोदर असल्याचे सांगितले. आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (दि. ७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश गजानन सोनवणे (वय २१, रा. अंमळनेर, जि. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















