- पतीचा हुंड्यासाठी पत्नीचा छळ; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२१) :- पीडित विवाहिता आणि आरोपीचे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले होते. आरोपींनी विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. सासू-सासर्यांनी विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला.
पैसे, चारचाकी वाहन न दिल्याने पतीने विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. तसेच विवाहितेचे स्त्रीधन परत केले नाही. ही घटना २२ डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०२१ या कालावधीत भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश येथे घडली.
पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ७) फिर्याद दिली आहे. पती शोएब अथर सिद्दिकी (वय ३६), सासरे अथर सिद्दिकी (वय ७२), सासू (वय ६५, सर्व रा. भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















