- शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- जयसिंग राठोड यांची बहीण राजेश्री राठोड (रा. मुळानगर, सांगवी) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लेबर शुभम जाधव (रा. देहू) हा देखील आला होता. शुभम याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल परत देऊन टाका, असे म्हणाल्याने व जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी जयसिंग राठोड यांना सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले.
तसेच हाताने व लाथा-बुक्क्यांनी ही मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुळानगर, जुनी सांगवी येथे रविवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
जयसिंग ढाकू राठोड (वय ३६, रा. चिखली घरकुल) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश राठोड, लक्ष्मण राठोड, रुपेश राठोड (सर्व रा. मुळानगर, सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करीत आहेत.
















