- मोशीतील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- ‘तू आमच्यामध्ये कशाला येतो’, असे तो थेटे यांना म्हणाला. त्यानंतर त्यांच्या डाव्या गालावर चापट मारून धक्काबुक्कीही केली.
सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुजित जाधव याला अटक केली. अथर्व हॉटेल समोर, जुना जकात नाका, मोशी येथे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस कर्मचारी संजय बाबासाहेब थेटे यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजित चंद्रकांत जाधव (वय २४, रा. हनुमान नगर, भोसरी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे तपास करीत आहेत.