- स्थायी समितीच्या इतर १६ सदस्यांचीही चौकशी होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- महापालिका भवनात स्थायी समितीच्या स्वीय सहाय्यकास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रंगेहाथ पकडले. त्यानंतर अचानक पालिकेतील महापौर व स्थायी समिती कार्यालयावर धाड टाकली.
त्यांनी स्थायी सभापती नितीन लांडगे, अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे यांना अटक केली आहे.
या पाचही आरोपींना आज गुरुवारी पिंपरीतील मोरवाडी कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, शासकीय सुट्टी असल्याने आरोपींना शिवाजीनगर कोर्टात नेण्यात आले. तिथे शिवाजीनगर कोर्टाने त्यांना २१ ऑगस्टपर्यँतची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांची चौकशी होणे बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला. शनिवारपर्यँत आरोपींना पोलीस कस्टडी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
















