- थेरगावातील पानसरे कॉलनीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- थेरगावातील पानसरे कॉलनीत गुरुवारी सायंकाळी एक तरुण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली आणि तरुणाला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक दुधारी तलवार आणि एक कोयता मिळून आला. ऋतिक रवींद्र शेलार (वय २१, रा. बोरडेनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक मोहम्मद गौस रफिक नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ही हत्यारे जप्त करत त्याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












