- राज्य सरकार अध्यादेश काढाणार का?..
- वाचा…. उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- महापालिका, नगरपालिकांसाठी एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाने स्वत:च्या स्तरावर घेतला आहे. परंतु, यानंतर पुणे शहर आणि राज्य पातळीवरील नेते मते व्यक्त करू लागले आहेत. यावर महाविकास आघाडी एकत्र निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुका एक सदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, ‘वॉर्ड एक, दोनचा कि तीनचा करावा, हा पूर्ण अधिकार राज्य सरकारचा आहे.
महाविकास आघाडी सर्व नेते मंडळींनी अद्याप एकत्र बसून त्यावर निर्णय घेतलेला नाही. नगर पंचायती, नगरपालिकांबाबत काय भूमिका घ्यायची, महापालिकांबाबत काय निर्णय घ्यायचा, याची अनौपचारिक चर्चा झाली आहे. आता एकत्र निर्णय घ्यावा लागेल. राज्य सरकारला अध्यादेश काढावा लागेल. त्यासाठी नागपूरच्या अधिवेशात कायद्यात बदल करावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चर्चा करू. ते अंतिम निर्णय घेतील.’












