- वाल्हेकरवाडीत शाळा इमारतीसाठी ९ कोटी ६१ लाखाच्या खर्चास स्थायीची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२१) :- केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिके मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी आरक्षण क्रमांक ७७ येथे निवासी गाळे बांधण्याकामी येणा-या १ कोटी ४५ लाख १४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली यासह विविध विकास कामांसाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने ऑनलाईन बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. गणेशोत्सव काळामध्ये विसर्जनासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहनांवर विसर्जनाची सोय उपलब्ध करुन द्यावी यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार ५० पेक्षा जास्त वाहने ठेवावीत अशा सूचना अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी आयुक्तांना केल्या.
प्रभाग क्र.६ मध्ये पूर्व भागात खड्डे व चरांची डांबरीकरणाचे सुधारणा करण्याकामी येणा-या २७ लाख २८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभाग कोविड-१९ कामकाजाकरीता शासनाकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्याबाबत ५० कोविड लसीकरण केंद्राकरीता ५० स्टाफनर्स २५ डेटाएन्ट्री ऑपरेटर २५ वॉर्डबॉय वार्डआया असे एकूण १०० कुशल अकुशल मनुष्यबळाची २ महिने कालावधी करीता करारनामा करुन नेमणूक करण्याकामी येणा-या ५० लाख ८१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.३० दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बोपोडी पूल रस्ता अद्ययावत पध्दतीने विकसित करण्याकामी येणा-या ५ कोटी ८३ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र १६ वाल्हेकरवाडी येथे प्राधिकरण कडून आलेल्या जागेवर शाळा इमारत बांधण्याकामी येणा-या ९ कोटी ६१ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेचे “अ”,“ब”,“क”,“ड”,“इ”,“फ” “ग” व “ह” क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते/गटर्स साफसफाई करणेकामी किमान वेतन दराने कामगार उपलब्ध करणे याकामासाठी २ वर्ष कालावधीसाठी किमान वेतनावरील सेवा शुल्कावर निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार ८ क्षेत्रिय कार्यालयाकडे किमान वेतन दरानुसार ६ संस्थांमार्फत १५२९ सफाई कामगार पुरविण्यात आलेले आहे. त्याकामासाठी किमान २ महिने कालावधीकरीता तथा निविदा प्रक्रिया पुर्ण होवून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल यापैकी जे प्रथम होईल तोपर्यंत मुदतवाढ देवून याकामी येणा-या ७ कोटी १० लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करणेकामी ८००० अॅन्टीजेन टेस्ट किट्स खरेदी करण्याकामी येणा-या ५० लाख ३० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ग प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे आणि चोकअप काढण्याच्या कामासाठी येणा-या १ कोटी १६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. ड प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पध्दतीने साफसफाई करणे व चोक अप काढण्याच्या कामासाठी येणा-या ३२ लाख ७७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३० फुगेवाडी मधील लोकमान्य टिळक शाळा विस्तारीकरण करण्याकामी येणा-या २ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२० मधील महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी समोरचा नाला विकसित करण्याकामी येणा-या १ कोटी १४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. संत ज्ञानेश्वर उद्यान प्राधिकरण निगडी देखभाल करण्याकामी येणा-या ४४ लाख ७३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १० मधील शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टीचे उर्वरित कामे करण्याकामी येणा-या ५ कोटी ५५ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांमध्ये MPLS द्वारे इंटरनेट कनेक्टीव्हिटी करण्याकामी येणा-या ६८ लाख २१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. महानगपालिकेच्या विविध रुग्णालये, कोविड केअर सेंटर ई. ठिकाणी कोरोना विषाणु बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारे इजेंक्शन इनोक्सोपॅरीन सोडीयम ४० खरेदी करणेकामी येणा-या ८१ लाख ५० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.३० दापोडी कासारवाडी मधील रेल्वेगेट सर्वे नं.४९८ ते सर्वे नं. ४८५ पर्यंत वरुण हॉटेल पाठीमागील रस्ता अद्यावत पध्दतीने विकसित करण्याकामी येणा-या १ कोटी १९ लाख २८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.












