- दिघीतील घटना; मानलेल्या सुनेसह इतर दोघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- मानलेल्या सुनेने तिच्याकडे असलेल्या चावीने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप उघडले. बेडच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन कपाटातील आणि घरातील ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घरातील भांडी व इतर साहित्य असा दोन लाख दोन हजार १०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान दिघीतील स्कायलाइन बिल्डिंग येथे घडली. मंगला हनुमंत जाधव (वय ६६, रा. स्कायलाइन बिल्डिंग, दिघी) यांनी बुधवारी (दि. १) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शर्मिला महादेव वाबळे (वय ३०), तिचा भाऊ अक्षय महादेव वाबळ (वय २६, दोघे रा. गोलेगाव, ता. शिरूर) आणि एक अनोळखी व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करीत आहेत.