- तरुणाच्या सॅकमधील दोन तोळ्याच्या ब्रेसलेटची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२१) :- हिंजवडीतील साखरेवस्तीच्या फॅकशिफ हॉटेलमध्ये फिर्यादी शुक्रवारी थांबले होते. रात्री साडेदहा ते शनिवारी दुपारी दोन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या रूममध्ये प्रवेश केला.
त्यांच्या सॅकमध्ये ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. अक्षय प्रमोद बाफना (वय २२, रा. कसबापेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.