- शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा राज्य सरकारवर घणाघात..
- शहर मनसेचे आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२१) :- इतर राज्यांनी अटी-शर्तीसह धार्मिक स्थळे उघडायचा निर्णय घेतलेला आहे. त्या अटी व शर्तींचे पालन करून त्या-त्या राज्यात भावीक दर्शनाचा लाभ घेत आहेत. मात्र, महाराष्ट्रात सत्ताधा-यांना झुकते माप मिळत असून हिंदूंवर कारवाई केली जात आहे. या विरोधात पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली मंदिरं व इतर धार्मिक स्थळे उघडावीत यासाठी आकुर्डीतील खंडोबा मंदिर येथे सोमवारी (दि. ६) रोजी घंटानाद आंदोलन केले.
या आंदोलनात रूपेश पटेकर, राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितिन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ, राजेश अवसरे, ऋषिकेश जाधव, विपुल काळभोर, के. के. कांबळे, गणेश वाघमारे, शंकर बिराजदार, डी. एम. कोळी, दिनकर सूर्यवंशी, महिला सेनेच्या अध्यक्षा अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, वैशाली बोत्रे, संगीता कोळी, अरुणा मिरजकर, विद्यार्थी सेनेचे हेमंत डांगे, सुमित कलापुरे, विक्रम आढे, सोरटे, कृष्णा काकडे, रोहन कांबळे, वाहतुक सेनेचे सुशांत साळवी, शिवकुमार लोखंडे, नितिन सुर्यवंशी, अविनाश तरडे, कृष्णा महाजन, विशाल साळुंखे, महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे निलेश नन्नवरे, भरत क्षेत्र, मंगेश गायकवाड, ऋषिकेश पाटील, जनहितचे राजू भालेराव, मिलिंद सोनवणे, शैलेश पाटिल, विजया परदेशी, चित्रपट सेनेचे दत्ता घुलेव मनसैनिक उपस्थित होते.
शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, राज्य सरकारने गणेशोत्सव, मंदिरातील उपासना व दर्शनासाठी नियमावली जाहीर करावी त्याचं पालन करूनच हिंदूंचे सण साजरे करू, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. मात्र, त्याकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. स्वतःचे राजकीय कार्यक्रम रेटताना ह्या तिन्ही पक्षाला कुठलंही बंधन नाही. पंढरपूरची पोटनिवडणूक, पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन, जुन्नर आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये झालेला कार्यक्रम किंवा शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे भरगच्च मेळावे अशा वेळेला कुठेही कोरोना नसतो. परंतु; हिंदू सणांची कार्यक्रमाची रूपरेषा समोर येते त्या वेळेस हे सरकार हिंदूंची गळचेपी करते. नियमामध्ये दोषी आढळलो तर आम्ही कारवाईस पात्र आहोत. मात्र इथे सत्ताधा-यांना झुकते माप देऊन राज्य सरकार भाविक-भक्तांवर अन्याय करीत आहे, असा आरोप चिखले यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
















