- रामनगरमधील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- आईवडील बाहेर गेलेले असताना तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोसरी पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तरुणाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रामनगर, बोपखेल येथे मंगळवारी (दि. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. विकास बापू शिंदे (वय ३०, रा. रामनगर, बोपखेल), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विकास हा बिगारीचे काम करीत होता. त्याच्या आई-वडिलांसह तो रामनगर येथे राहात होता. विकास हा मंगळवारी कामाला न जाता घरीच होता. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












