- खिशातून बळजबरीने पैसे काढले; म्हेत्रेवस्तीमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- ‘मला दारू प्यायची आहे. मला पैसे पाहिजे’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्या गालावर ब्लेडने वार करून त्यांचा गाल फाडला. फिर्यादी यांना जबर जखमी करून ‘तू अस्लम भाईशी पंगा घेतो का’ असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातून एक हजार ८०० रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. शनिवारी (दि. ४) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास साने चौक, चिखली येथे फोनवर बोलत फिर्यादी थांबले असता घटना घडली.
अमर मनोहर म्हेत्रे (वय २६, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अस्लम मुजावर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












