- पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारल्या जाणार नाहीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- गणेशोत्सवासाठी शहरात महापालिकेच्या वतीने १२८ मूर्ती संकलन केंद्रांची सोय करण्यात येणार आहे. मूर्तीदान स्विकारण्यासाठी ४० फिरत्या रथांची सोय असणार आहे. निर्माल्य संकलनासाठी वेगळी वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक नियोजन सुरू केले आहे.
गणेश मूर्ती दान स्वीकारण्यासाठी प्रभागनिहाय व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात ४ या प्रमाणे एकूण मूर्ती संकलन केंद्रांची सोय असणार आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारल्या जाणार नाही. मंडळाच्या परिसरात फुलांचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास बंदी असणार आहे. घाटांवर गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी राहील. आरतीच्या वेळी जास्तीत जास्त पाचपेक्षा अधिक व्यक्ती शक्यतो नसाव्या. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना परवानगी नसेल.