- जबरदस्तीने महिलेच्या घरात शिरून मारहाण; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२१) :- आरोपींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही केस मागे घेण्यासाठी दमदाटी करत आरोपी फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसले. तुझा नवरा कुठे गेला आहे, त्याला केस मागे घ्यायला लाव, असे म्हणत आरोपींनी त्यांचे हातपाय पकडून मारहाण केली.
आरोपीने हातातील हॉकी स्टीकने फिर्यादीच्या डाव्या पायावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. ११) सकाळी साडेदहा वाजता पत्राशेड चिंचवड येथे घडली. महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अभिषेक गायकवाड, शिला गायकवाड, सारिका गाडकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे पती आणि आरोपी यांच्यात जुनी भांडणे होती. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.