मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात चौका-चौकांत प्रमुख रस्त्यावर अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर, जाहिराती, भित्तीपत्रके हे सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, फुटपाथ, विद्युत खांब, विद्युत डीपी, उड्डाणपूल, बसस्टॉप आदी ठिकाणी लावल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन होत आहे.
ज्या व्यावसायिकांनी, नागरिकांनी अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, जाहिराती, भित्तीपत्रके आदी लावली असतील; त्यांनी २१ सप्टेंबरपर्यंत स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ मधील तरतुदीनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा ‘ ब ‘ प्रभागाच्या सहा. आयुक्त सोनम देशमुख यांनी दिला आहे.