- निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- घराच्या किचनमध्ये असताना अचानक घराच्या दरवाजावर दगड मारत असल्याचा आवाज फिर्यादीला ऐकू आला. फिर्यादीने घराचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी रिक्षातून आल्याचे कळाले.
रिक्षामध्ये माणसे असल्याचेदेखील फिर्यादीला दिसले. आरोपीने फिर्यादीच्या घराच्या दरवाज्याजवळ पडलेले दगड, बाटली फिर्यादीच्या घराच्या दिशेने भिरकावली, तसेच दगड मारून फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान देखील केले. आरोपी फिर्यादीच्या घराजवळ आला. फिर्यादीशी झटापट करून शिवीगाळ केली. तुला उचलून आणतो, अशी धमकी देऊन आरोपीने कपडे फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
निगडीतील ओटास्कीम येथे मंगळवारी (दि. १४) रात्री अकराच्या दरम्यान घडली. विशाल प्रकाश पंडीत (वय ३६, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.