- रहाटणीतील घटना; वाकड पोलीसात आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दगड मारून महिलेच्या पतीला जखमी केले. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रहाटणी फाटा थेरगाव येथे सोमवारी (दि. १३) रात्री हा प्रकार घडला.
पीडित महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १६) फिर्याद दिली. महेश कदम (वय २७), आदित्य अढारे (वय २२), विनोद सातपुते (वय २५), तसेच एक अनोळखी इसम (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची बहीण हे फिर्यादीच्या पतीला शोधण्यासाठी रहाटणी फाटा येथे गेले होते. त्या वेळी फिर्यादीच्या तोंडओळखीचा आरोपी आदित्य अढारें व त्याचे मित्र आरोपी महेश कदम व विनोद सातपुते हे तिथे आले. अढारे याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शेरेबाजी केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांची बहीण घरी पोहोचल्या. काही वेळानंतर आरोपींचे अनोळखी मित्र असे चौघे जण फिर्यादी यांच्या घरी आले. आम्हाला शिव्या का दिल्या, असे म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादीने घराचे दार उघडले असता आरोपी घरात घुसले. त्यामुळे फिर्यादी घराबाहेर आल्या मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या पतीला जखमी केले.


















