- ठेकेदाराविरोधात कामगार एकवटले; न्याय देण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- नेहरूनगर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली. महामानव एक्सप्रेस असंघटीत कामगार संघटनेचे सभासद व कर्मचाऱ्यांनी आ. बनसोडे यांची भेट घेतली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
या कामगार संघटनेचे सभासद हाऊस किपींग, वार्ड बॉय, वॉर्ड मावशी, रुग्ण काळजी विभाग अशा विविध पदावर रुजू होते. मात्र कोणतीही पूर्वकल्पना ना देता त्यांना १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कामावरून कमी केल्याचा मेसेज आला, कोणतीही कायदेशीर नोटीस ना देता कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. कोविडच्या अत्यंत कठीण काळात स्वतःची व आपल्या कुटुंबाची पर्वा ना करता या कर्मचाऱ्यांनी रूग्णांची मनोभावे सेवा केली.
तसेच कामावर रुजू होतांना जे वेतन ठरले होते ते ना देता प्रत्यक्षात कामगारांना कमी वेतन देण्यात आले. पी. एफच्या नावाखाली वेतनात कपात करण्यात आली, असे कामगारांचे म्हणणे होते. ठेकेदाराने आमची फसवणूक केली असून, या बाबतीत सखोल चौकशी करण्यात यावी व कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. पालिका प्रशासनासोबत बोलून विषय निकाली काढू, कामगारांना इतर ठिकाणी तातडीने भरती करून घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आ. बनसोडे यांनी दिले.


















