- बँकेच्या व्यवस्थापकासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- इंडियन बॅंकेच्या मॅनेजरला अनोळखी व्यक्तीने फोन करून फिर्यादीचा भाऊ बोलत असल्याचे सांगितले. या इसमाने वैद्यकीय इमर्जन्सी असल्याचे सांगून वेगवेगळ्या खात्यावर ५९ लाख ३२ हजार ९५१ रुपये पाठविण्यास सांगितले. मेल देखील पाठवला. बॅंक मॅनेजरने आलेल्या फोनबाबत खातरजमा न करता फिर्यादीच्या परस्पर खात्यावर पैसे पाठवले आणि पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना काळभोर नगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि. १४) रोजी घडली. राजकुमार घनश्याम गिहाणी (वय ५५, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार इंडियन बॅंक, चिंचवड शाखेचे मॅनेजर लल्लनसिंग, एक मोबाईल नंबर, एक मेल आयडी आणि खात्यावर पैसे जमा करून घेणारे खातेधारक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क) (ड) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
















