- आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल; निगडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- मयत इसमाने आरोपी आणि इतर मुलांचे भांडण सोडवले होते. त्या कारणावरून आरोपींनी तरुणाच्या घरावर दगड मारले असता आरोपींच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले’ असा जाब विचारला. या कारणावरून आरोपीने सिमेंटच्या गट्टूने मयत इसमाच्या कपाळावर जोरात प्रहार केला तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून इसमाला ठार मारले.
आरोपीने जमिनीवर पडलेले रक्त पाणी टाकून धुवून पुरावा नष्ट केला. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे सोमवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. संपत भीमराव गायकवाड (वय ४५, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संध्या संपत गायकवाड (वय ३६) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याप्रकरणी वैभव उर्फ बोचू संतोष अडागळे, युवराव संतोष अडागळे, ओमकार बाळू अडागळे, चेतन बाळू अडागळे, संतोष अडागळे (सर्व रा. अण्णाभाऊ साठेनगर चाळ नंबर दोन, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.