- खा. बारणे यांचे विश्वासू अनं शिवसेना नगरसेविकेच्या पतीची भाजपमध्ये उडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह अमोल कलाटे व असंख्य कार्यकर्त्यांनी आज बुधवारी (दि. २२) रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी आ. लक्ष्मण जगताप उपस्थित होते.
चिंचवडे हे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. चिंचवडे यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. आमदार जगताप यांनी खासदार बारणे यांना या निमित्ताने शह दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे